मंडळाचा पूर्वतिहास व मंडळाची उद्दिष्ट्ये
- सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे पूर्वपरिक्षण करण्यासाठी मुंबई पोलिस अधिनियम 1951 मधील कलम 33 (1) (wa)(iii) अन्वये दिंनाक 05 जानेवारी 1954 रोजीच्या अधिसूचनेनुसार गृह विभागामार्फत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. सार्वजनिक मनोरंजनाच्या जागा ( सिनेमाव्यतिरिक्त) आणि सार्वजनिक मनोरंजनाचे प्रयोग मेळे व तमाशा यांना अनुज्ञप्ती देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे - नियम 1960 व सुधारीत नियम 1974 मधील नियम 137 ते 145 (अ) अन्वये रंगभूमी मंडळाची कार्यपध्दती तसेच अनुसरावयाची सर्वसाधारण तत्वे निश्चित करण्यात आली आहेत.
सन 1972 मध्ये हे मंडळ गृह विभागाकडून तात्कालीन सामाजिक न्याय क्रिडा व सांस्कृतिक विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले. सन 2006 मध्ये सांस्कृतिक विभाग सामाजिक न्याय विभागापासून वेगळा झाला आणि तेव्हा पासून हे मंडळ सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारित कार्यरत आहे. मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या अंतर्गत असलेल्या Rules For Licencing & controlling Places Of Public Amusements 1960 च्या नियमांमध्ये 1974 मध्ये सुधारणा करण्यात आल्या, त्यानुसार सार्वजनिक मनोरंजनाच्या जागा (सिनेमाव्यतिरिक्त) आणि मेळे, व तमाशा धरुन, सार्वजनिक मनोरंजनाचे प्रयोग आणि अनुज्ञप्ती देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे ( 9 वी सुधारणा ) नियम 1974 मधील नियम 137 ते 145 (अ) नुसार मंडळाचे कार्य चालते.
- सदर कार्यपध्दतीनूसार मंडळाकडून सार्वजनिक ठिकाणी सादर होणा-या मनोरंजनाच्या (नाटक/ एकांकिका/ लोकनाटय/तमाशा /वग/ मेळे इत्यादी) कार्यक्रमासाठी नागरिकांनी सादर केलेल्या लिखाणांचे अशासकीय सदस्यांकडून पूर्वपरिक्षण करुन त्यांना अध्यक्षांच्या मान्यतेने कायमस्वरुपी योग्यता प्रमाणपत्र (Suitability Certificate) देण्यात येते.
- सार्वजनिक करमणूकीच्या कार्यक्रमांमुळे सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नितीमत्ता तसेच देशाचे सार्वभौमत्व आणि सुरक्षितता, एकात्मता यांना बाधा येणार नाही. व कोणत्याही प्रकारे कायदयाचे उल्लघन होणार नाही. याची दक्षता घेणे हा पूर्वपरिक्षणामागचा उद्देश आहे. या उदिष्टपूर्तीसाठीच आधारभूत संहितेच्या लिखाणाचे पूर्वपरिक्षण मंडळाकडून करण्यात येते.